मानवाच्या जीवनात ज्ञान, आत्मविश्वास आणि उद्दिष्टपूर्णता असेल, तर कुणीही अशक्य वाटणाऱ्या गोष्टी साध्य करू शकतो. हाच विश्वास घेऊन शिवतंत्र अकॅडमी ची स्थापना झाली.
आमचे ध्येय एकच – व्यक्तीचा सर्वांगीण विकास करून त्याच्या जीवनात खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवणे.
संस्थापकांची प्रेरणादायी कथा
शिवतंत्र अकॅडमीचे संस्थापक शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे हे केवळ एक शिक्षक नाहीत, तर प्रेरणास्त्रोत आहेत.
शिवाश्रम – स्वप्न साकारलेले
शिवाश्रमामध्ये दिव्यांग बांधवांसाठी विविध कौशल्य विकास व उद्योग सुरू केले, ज्यातून आत्मनिर्भरतेचा मार्ग निर्माण झाला.
सर्वात विशेष म्हणजे – हा प्रकल्प कोणत्याही सरकारी मदतीशिवाय, पूर्णपणे स्वखर्चाने उभा राहिला.
हीच खरी समाजसेवेची व्याख्या!
शिवतंत्र अकॅडमीची सुरुवात
२०२१ पासून, शिवतंत्र अकॅडमी मार्फत ऑनलाईन Public Speaking आणि Personality Development Programs सुरू करण्यात आले.
अनेक विद्यार्थ्यांनी, गृहिणींनी, उद्योजकांनी आणि व्यावसायिकांनी या प्रवासात स्वतःला नवी ओळख दिली.